…तर खासदारकीचा राजीनामा देईन-उदयनराजे भोसले

October 29, 2016 3:52 PM0 commentsViews:

 Udayan raje bhosll213

29 ऑक्टोबर : सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 उमेदवार निवडून नाही आले तर मी खासदारकीचा राजीनामा देईल असं धक्कादायक वक्तव्य साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील सातारा नगरपलिकेतील मनोमिलन तुटले. सातारा नगरपलिकेतील गेल्या दहा वर्षापासूनचे मनोमिलन संपुष्टात आले आहे. आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी सौ.वेदांतिका यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वरून या वादाला सुरुवात झालीये. त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत 40 उमेदवार निवडून नाही आले तर मी खासदारकीचा राजीनामा देणार अशी घोषणाच खा.उदयनराजे भोसले यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close