सपाच्या खासदाराचा पीएच निघाला पाकचा हेर?

October 29, 2016 3:58 PM0 commentsViews:

sp_pak_her29 ऑक्टोबर : दोन दिवसांपूर्वी हेरगिरी करणा-या पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील अधिका-याच्या अटकेनंतर याच प्रकरणात समाजवादी पक्षाच्या खासदाराच्या पीएला अटक करण्यात आलीय. समाजवादी पक्षाचे खासदार चौधरी मुन्नावर सलीमच्या पीए फरहतला अटक झालीय. दिल्ली क्राईम ब्रँचनं ही कारवाई केलीय.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला गुप्तहेर मेहमूद याने पीए फरहातचं नाव घेतलं होतं. त्यानुसार, पीए फरहतला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. फरहतकडून काही गोपनीय कागदपत्र जप्त केली गेलीत. त्याने संरक्षण, परराष्ट्र आणि नौकावहन क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close