मराठीचा अभिमान मिरवणारे टी शर्टस्

April 29, 2010 11:46 AM0 commentsViews: 6

29 एप्रिल

' गर्जा महाराष्ट्र माझा' किंवा 'लाभले आम्हास भाग्य जाहलो मराठी' या ओळी नुसत्या कानावर पडल्या तरी मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येतो.

या ओळी आता दिमाखात मिरवता याव्यात म्हणून सुलेखनकार अच्युत पालव प्रयत्न करत आहेत.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यावर आधारीत कविता असणारे टी शर्टस् त्यांनी बनवले आहेत. 'व्यर्थ न हो बलिदान' असे या टी शर्ट्सच्या मालिकेचे नाव ठेवण्यात आले आहे.

यामध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणार्‍या 105 हुतात्म्यांची नावे असलेले टी शर्ट्स, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या अभिमान गीतांचे रेखाटन असणारे टीशर्ट, सेनापती बापट यांची वॉटर इमेज, त्यांच्या ओळी, त्याबरोबरच आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'च्या पहिल्या अंकासाठी सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी असे विविध टीशर्टस् त्यांनी तयार केले आहेत.

भारतीय वस्त्रशिल्पतर्फे या टीशर्ट्सची निर्मिती करण्यात आली आहे. 295 रुपये किंमत असणारे हे टीशर्टस् 15 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय www.marathimanoranjan.com या वेबसाईटच्या माध्यमातूही या टीशर्टस्‌ची खरेदी करता येऊ शकते.

close