टीम इंडियाची दिवाळी भेट, न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिका जिंकली

October 29, 2016 8:00 PM0 commentsViews:

team_india_win29 ऑक्टोबर : भारताने न्यूझीलंड संघाला अवघ्या 79 धावांत गुंडाळत विजयी दिवाळी साजरी केलीये. अमित मिश्राच्या घातक मा•यापुढे किवींचा संघ 79 धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने 5 वनडेची मालिका 3-2 जिंकलीये.

विशाखापट्टणम इथं खेळवण्यात आलेल्या अखेरच्या वनडे मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी ‘करो किंवा मरो’ अशी परिस्थिती होती. पण आजच्या मॅचमध्ये भारताने एकहाती सामना राखला आणि विजयाचे फटाके फोडले. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग केली. निर्धारीत 50 ओव्हरमध्ये 6 विकेटवर भारताने 269 धावांपर्यंत मजल मारली.
रोहित शर्माने 70 रन्स, विराट कोहलीने 65 आणि कप्तान धोणीने 41 रन्स करत भारताचा धावफलक उंचावला.

270 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब राहिली. अमित मिश्राच्या भेदक मा•यापुढे अवघा संघ ढेपाळला. अमित मिश्राने 5 विकेट घेऊन चांगलाच सुरुंग लावला. न्यूझीलंड टीमकडून कॅप्टन केन विलियम्सने सर्वाधिक 27 रन्स केले. पण बुमराहने केन विलियम्सनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर
रॉस टेलरने टीमचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण अमित मिश्राने 19 रन्सवर त्याला आऊट केलं. त्यानंतर एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. आणि अवघा संघ 100 रन्स सुद्धा गाठू शकला नाही. 79 धावांवर किवींना माघारी परतावं लागलं. 5 वनडेच्या या मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवत मालिका खिश्यात घातली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close