सुनील तटकरेंविरोधात पुतण्याचं बंड, सेनेकडून लढवणार निवडणूक

October 29, 2016 8:44 PM0 commentsViews:

sunil-tatkare129 ऑक्टोबर : राज्यात काका पुतण्यातील वादाची सर्वांनाच सवय आहे. पण, आता रायगडमध्येही पुतण्याने काकांविरोधात बंड पुकारले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात पुतण्या संदीप तटकरे यांनी शिवसेनेकडून मैदानात उडी घेतलीये.

रायगड जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती परंतु, ती नाकारल्याने संदीप तटकरे यांनी थेट शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे यांनीही बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रोहयातील लढत रंगतदार होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close