जवानांसोबत मोदींनी साजरी केली दिवाळी

October 30, 2016 4:30 PM0 commentsViews:

Modi with jawan

30 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) हिमाचल प्रदेशमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. पंतप्रधानांसोबत दिवाळी साजरी केल्याने जवानांचा आनंदही द्विगुणित झाला होता. सैन्य, भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांना मिठाई देऊन मोदींनी दिवाळी साजरी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन वर्षांपासून जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. मोदी दिवाळीत भारत-चीन सीमेवर असलेल्या आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार अशी चर्चा सुरुवातीला होती. पण आज (रविवारी) दुपारी मोदी हिमाचलप्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील समदो इथे पोहोचले. मोदींनी जवानांना मिठाई देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. तर जवानांनीही मोदींना मिठाई भरवली.

समदोला जाण्यापूर्वी मोदी काही वेळ चांगो या गावातही थांबले होते. पंतप्रधान गावात आल्याचे बघून ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. मोदींनी गावातील लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर दिवाळीत पंतप्रधान सोबत आल्याने जवानांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

दरम्यान, सीमारेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शहीद झालेल्या सहका-यांना श्रद्धांजली म्हणून दिवे लावले होते.  यंदाची दिवाळी जवानांना समर्पित करुया असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close