गोळीबाराच्या वर्षावातही जवानांनी साजरी केली दिवाळी

October 30, 2016 4:56 PM0 commentsViews:

BSF asdja

30 ऑक्टोबर : देशभरात दिवाळी साजरी होत असताना काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर मात्र तणावाचे वातावरण आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या गोळीबाराला भारताचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी घरादारापासून दूर डोळ्यात तेल घालून पहारा देत असलेल्या या जवानांनी काल रात्री एलओसीवर दिवाळी साजरी केली.

सीमेपलीकडून गोळीबार सुरू असतानाच  जम्मू आणि काश्मीरमधील आरएसपुरा विभागात बीएसएफच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर पणत्या लावून दीपोत्सव राजरा केला. जम्मू आणि काश्मीर प्रमाणेच अन्य भागातही सीमेवर तैनात असलेल्या जवानांकडून दिवाळी साजरी करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close