शहीद नितीन कोळींना श्रीनगरमध्ये आदरांजली, उद्या मूळगावी अंत्यसंस्कार

October 30, 2016 5:52 PM0 commentsViews:

Holi213

30 ऑक्टोबर : कुपवाड्यात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर मूळगावी म्हणजे सांगलीतल्या दुधगावमध्ये कोळी यांचं पार्थिव नेण्यात येईल.

नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी संपूर्ण दुधगाव लोटलं आहे. सकाळी नितीन कोळी यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. त्यांचं पार्थिव दर्शनासाठी श्रीनगर इथल्या लष्करी तळावर ठेवण्यात आलं होतं.

मूळ सांगलीतील कुपवाडचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफमध्ये रुजू झाले होते. ते सध्या बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सीमेचं संरक्षण करत होते. त्यांच्यामागे पत्नी तसंच चार आणि दोन वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे. शहीद कोळी यांच्या परिवाराला राज्य सरकारनं 15 लाखांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close