आता धूम टी – 20 वर्ल्ड कपची

April 29, 2010 12:13 PM0 commentsViews: 3

29 एप्रिल

आता लवकरच धूम सुरू होणार आहे, ती टी – 20 वर्ल्ड कपची… शुक्रवारपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणार्‍या या वर्ल्ड कपमध्ये जगभरातील 12 टीम्स एकमेकांना भिडणार आहेत.

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम या वर्ल्ड कपसाठी आज वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाली. भारतीय टीमची वर्ल्डकप मिशन सुरू होणार आहे ते अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचने.

1 तारखेला होणार्‍या या मॅचपूर्वी टीमला सरावासाठी बराच वेळ मिळणार आहे. पण टीम कोणतीही सराव मॅच मात्र खेळणार नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर भारतीय टीमची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी.

दुखापतीच्या कारणामुळे भारताचा ओपनिंग बॅट्समन वीरेंद्र सेहवाग मात्र या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही.

close