5200 गावं दुष्काळमुक्त केली हीच सरकारची सगळ्यात मोठी उपलब्धी – मुख्यमंत्री

October 31, 2016 2:58 PM0 commentsViews:

Devendra fadnavis

31 ऑक्टोबर :  सरकारला आज 2 वर्ष पूर्ण होत असताना आम्ही सेलिब्रेशन नव्हे तर कम्युनिकेशनवर भर दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सांगितलं. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे आज नागपुरात भाजपकडून विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहीद जवान नितिन कोळी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच राज्यातील जनतेचेही आभार मानले. 5200 गावं दुष्काळमुक्त केली हीच सरकारची आपली सगळ्यात मोठी उपलब्धी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी जनेतेचे आभार मानताना 2 वर्षांपूर्वी जेव्हा सरकारने काम सुरू केलं तेव्हा अनेक आव्हानं समोर होती, याची आठवण करुन दिली. आमच्यापुढे अजूनही खूप आव् हाने आहेत. मात्र आता आम्ही महाराष्ट्राला नंबर वन बानवलं आहे आणि तो आम्ही नंबर वनवर टिकवून ठेवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close