औरंगाबादमध्ये मर्सिडीसची धूम

April 29, 2010 12:19 PM0 commentsViews: 3

29 एप्रिल

मर्सिडीस गाडी एकदा तरी चालवावी…किमान एकदा तिच्यात बसावं तरी…असं प्रत्येकालाच वाटतं.

पण ही गाडी विकत घेण्याची हिंमत मात्र होत नाही. कारण या गाडीची प्रचंड किंमत!

पण एकाच वेळी 115 गाड्या खरेदी करण्याचं धाडस केलंय काही औरंगाबादकरांनी.

औरंगाबादमधील व्यापारी, उद्योजक आणि डॉक्टर यांनी एकत्र येऊन 55 कोटी रुपयांच्या तब्बल 115 मर्सिडीस गाड्या खरेदी केल्या आहेत.

एकाच वेळी 115 मर्सिडीस गाड्या खरेदी करण्याचा हा पहिलाच विक्रम आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये या 115 गाड्या औरंगाबादमध्ये दाखल होतील.

close