मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, सात जणांना अटक

November 1, 2016 1:28 PM0 commentsViews:

vadala_rape_case

01 नोव्हेंबर : पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत नवं घर शोधणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार झाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीत काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली. पीडित महिला तिच्या पतीसह जोगेश्वरीतील श्यामनगर झोपडपट्टीत घर पाहण्यासाठी गेली होती. एका स्थानिक महिलेच्या मदतीनं हे जोडपं वेगवेगळी घरं पाहत होतं. रात्री उशीर झाल्यानं त्यांना मदत करणारी महिला तिच्या घरी निघून गेली. त्याचवेळी झोपडपट्टीतील एका टोळक्याची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी या जोडप्याला एका घरात कोंडलं. त्यानंतर महिलेच्या पतीचे हातपाय बांधून त्याच्या समोरच आठजणांनी तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणी अंबोली पोलीसांनी सातजणांना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित महिलेला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close