दिवाळी निमित्त मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची झुंज

November 1, 2016 6:14 PM0 commentsViews:

 

01 नोव्हेंबर : दिवाळी निमित्त भाऊबीजेच्या दिवशी मनमाडला रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. गवळी समाजातर्फे गेल्या शंभर वर्षा पासून रेड्यांची झूंज आयोजित करण्याची परंपरा असून शहर परिसरातील रेडे या स्पर्धेत भाग घेतात.

radaa

पाडव्याच्या दिवशी रेड्याला सजवून त्याची वाजत-गाजत शहरतून मिरवणूक काढली जाते. रेड्याला गवळी समाजाच्या लक्ष्मी माता मंदिरात दर्शनासाठी आणले जाते. त्या नंतर भाऊबीजेच्या दिवशी शहरातील दरगुड़े मळा मैदान आणि स्टेडियम या दोन ठिकाणी रेड्यांची झुंज लावली जाते.

यात जिंकणाऱ्या रेड्याला आणि त्याच्या मालकाला रोख रक्कमचे बक्षीस देवून सन्मानित करण्यात येतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close