दिवाळीनिमित्त शाहरुखची जवानांसाठी खास कविता

November 1, 2016 7:51 PM0 commentsViews:

 

shahrukh-759

01 नोव्हेंबर : बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानने जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यायत आणि त्यांच्यासाठी एक कविताही लिहिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही दिवाळी जवानांना समपिर्त केली आहे. याच उपक्रमात शाहरुख खानही सहभागी झालाय. शाहरुख खानने याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या कवितेची व्हिडिओ क्लिप सगळ्यांशी शेअर केलीय. त्यासोबतच या दिवाळीला फटाके वाजवू नका, असं आवाहनही त्याने केलंय.

आपले पाय गालिच्यावर विसावतात
कारण जवानांचे बूट जमिनीत रुतलेले असतात.
आपले दिवस चांगले असतात
कारण ते नवी आव्हानं झेलत असतात.
आपल्या रात्री आनंदात जातात.
पण त्यांच्या रात्री अशांत असतात

आपण इथे सुखाने जगू शकतो
कारण हे जगणं त्यांचं देणं आहे.
या जवानांचा त्याग आपण विसरता कामा नये.
कारण त्यांची स्थिती आपण समजूही शकत नाही.
आपण सक्षम बनत जातो कारण सैनिकांचा लढा सुरूच आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी #sandesh2soldiers या उपक्रमाअंतर्गत देशवासियांना एक आवाहन केलं होतं. देशसेवेसाठी तत्पर असणार्‍या सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारा संदेश या उपक्रमाअंतर्गत पाठवावा, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला सर्वच स्तरांतून भरभरून प्रतिसाद देण्यात आला. बॉलिवूड कलाकारांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेत जवानांसाठी संदेश पाठवले. अभिनेता अक्षय कुमार, आमिर खान, सलमान खान यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटद्वारे त्यांचे संदेश पाठविले. आता शाहरुख खाननेही कवितेच्या माध्यमातून जवानांना संदेश पाठवलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close