… नाहीतर खासगी जमिनी लिलावात काढू – सुभाष देशमुख

November 1, 2016 8:41 PM0 commentsViews:

Subhasd deshkmsad

01 नोव्हेंबर : एफआरपीनुसार भाव द्या,नाहीतर खासगी जमिनी लिलावात काढू, असा इशारा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासनाने केलेल्या विधायक कामाचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी सोलापुरात आज पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना शेतकर्‍यांच्या उसाला हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे एफआरपीची रक्कम मिळालेली नाही, हे माझ्यादृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर, जे कारखानदार शेतकर्‍यांच्या उसाची एफआरपी देणार नाहीत त्यांच्या वैयक्तीक संपत्तीवर टाच आणून शेतकर्‍यांना एफआरपी देण्यास भाग पाडू, असं प्रतिपादनही देशमुख यांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close