इटलीतल्या भूकंपात मालमत्तेची हानी पण जीवितहानी नाही

November 1, 2016 9:26 PM0 commentsViews:

Itly

01 नोव्हेंबर :  इटलीत नॉशिर्यामध्ये सोमवारी भीषण भूकंप झाला. या भूकंपात जीवितहानी झाली नसली मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. या भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल एवढी होती. गेल्या दोन महिन्यांत झालेला हा तिसरा भूकंप आहे.मध्य इटलीला हा भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे नॉशिर्यामधल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. यामुळे जीवितहानी टळली पण मालमत्तेचं मात्र नुकसान झालं. 1980 नंतरचा हा सर्वात भीषण भूकंप आहे. या भूकंपामुळे 15 हजार रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

1980 सालीही मध्य इटलीलाही भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये 5 हजार जणांचा मृत्यू ओढवला होता. पण या दुर्घटनेतून धडा घेऊन इटलीमध्ये भूकंपप्रवण क्षेत्रात खबरदारी घेण्यात आली होती. इटलीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर्ण दक्षता घेतल्यामुळे या भूकंपात जीवितहानी टळली. नॉशिर्यामध्ये भूकंपामुळे सुमारे 20 जण जखमी झाले. त्यांना उपाचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close