बंगल्यात चोरांनी चहा,पोहे खाऊन केली चोरी

November 2, 2016 1:39 PM0 commentsViews:

parijat chor

2 नोव्हेंबर,वसई- दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी गेलेल्या डॉक्टर प्रशांत पाध्ये यांच्या बंगल्यात दोन चोरांनी दिवाळी साजरी केली.घरात घुसलेल्या या चोरांनी घरातच मुक्काम ठोकत दोन दिवस वास्तव्य केलं.

वसईमधल्या माणिकपूर इथे ही घटना घडलीय. डॉक्टर पाध्ये दिवाळीत बाहेरगावी गेल्यानं त्यांचा पारिजात बंगला रिकामा होता. ती संधी साधून दोन चोर घरात घुसले.

घरात चहा, पोहे बनवून हे चोर खात होते. पाध्येंचा बंगला आपलाच असल्याच्या तोऱ्यात या चोरांनी बंगल्यात मुक्काम ठोकला होता. बंगल्यात राहताना त्यांनी डॉक्टर पाध्येंच्या खाजगी डायरीमधून त्यांच्या बँकेचे अकाउंट नंबर आणि पासवर्डही चोरले.

मात्र शेजाऱ्यांना बंगल्यातल्या हालचालीचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. या चोरांनी 22 हजारांचा मुद्देमाल चोरल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पोलिसांनी आरोपी राजकुमार निशादला अटक केलीय. तर दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने पोलिस नक्की करतात काय असा प्रश्न माणिकपूरमधले नागरिक विचारायला लागलेत.

close