रोमान्सच्या बादशहाचं काय आहे यशाचं राज?

November 2, 2016 4:52 PM0 commentsViews:

2 नोव्हेंबर: शाहरुख खानचा आज वाढदिवस. 25 वर्ष होऊन गेली अजूनही किंग खान बॉलिवूडचा किंगच आहे. आजही त्याचे सिनेमे हिट होतायत. पाहू या काय आहे शाहरूखचं राज?

  • शाहरूखची कामावर निष्ठा: शाहरूख खान मध्यमवर्गातून आलाय. त्याच्या मागे कुणीच गॉडफादर नव्हता. फौजी मालिकेतून लोकप्रिय झालेला शाहरूख अजिबात फिल्मी पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडचा किंग झाला.
  • भूमिकेत टाकतो जीव : शाहरूख कुठलीही भूमिका तन्मयतेनं करतो. त्याचा हिरो जितका हिट होतो, तितकाच त्याचा खलनायक.छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्याचे फॅन्स आहेत.
  • किंग ऑफ रोमान्स : शाहरूख आहे रोमान्सचा बादशहा. म्हणूनच वयाच्या 50व्या वर्षीही तो कुठल्याही तरुण हिरॉइन्ससोबत रोमान्स करतो. माधुरी दीक्षितपासून दीपिकापर्यंत. शाहरूखनं बॉलिवूडच्या सगळ्या हिट हिरॉइन्ससोबत काम केलंय.
  • कुटुंबावर प्रेम: शाहरूख कितीही लोकप्रिय असू दे,आपल्या कुटुंबाशी त्याचं अतूट बंधन आहे. गौरी आणि शाहरूख इतकी वर्ष साथ साथ आहेत.शाहरूख आपल्या तीन मुलांनाही तितकाच वेळ देतो.
  • फॅन्सवर प्रेम : शाहरूखचं आपल्या फॅन्सवर भरपूर प्रेम आहे. तो त्यांना वेळ देतो. सोशल मीडियावरही किंग खान फॅन्सशी संपर्क ठेवतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

 

close