कमल हासन आणि गौतमी झाले विभक्त,13वर्षांचं नातं संपुष्टात

November 2, 2016 5:51 PM0 commentsViews:

kamal-gautami

2 नोव्हेंबर: कमल हासन आणि गौतमी यांचं 13 वर्षांचं नातं संपुष्टात आलंय. तामिळ अभिनेत्री गौतमीनं आपल्या ब्लॉगमध्ये हे लिहिलंय.कमल हासन आणि गौतमी गेली 13 वर्ष लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

आपल्या ब्लॉगमध्ये गौतमीनं लिहिलंय की, ‘हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. काळजावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागलाय.’

गौतमीनं कमल हासनसोबत अनेक तामिळ सिनेमांमध्ये काम केलंय. गौतमी म्हणते की ‘मी एक आईही आहे. मला माझ्या मुलीसाठी सर्व काही करायचेय. म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय.’

43 वर्षांच्या गौतमीला  सब्बुलक्ष्मी नावाची 16 वर्षांची मुलगी आहे. गौतमीला कॅन्सर झाला होता.त्यातून ती बरीही झाली.

मध्यंतरी ‘साबाश नायडू’ सिनेमाच्या वेळी तिचे आणि कमल हासनची मुलगी श्‌्ा्रुती हासनचे मतभेदही झाले होते.

कमल हासनची पहिली बायको वाणी गणपथी आणि दुसरी सारिका होती. कमल हासनला श्‌्ा्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली आहेत.

‘या कठीण निर्णयानंतर मला शांतता मिळालीय,’अशा भावना गौतमीनं व्यक्त केल्या.

close