गडचिरोलीसह 5 राज्यांमध्ये उद्या माओवाद्यांचा बंद

November 2, 2016 7:28 PM0 commentsViews:

Naxal 312

02 नोव्हेंबर - माओवाद्यांनी उद्या 5 राज्यांमध्ये बंद पुकारलाय. गडचिरोलीमध्येही उद्या माओवाद्यांचा बंद आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 30 माओवादी ठार झाले. त्याचा निषेध म्हणून माओवाद्यांनी हा बंद पुकारलाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांच्या सुरक्षेत यामुळे वाढ करण्यात आलीय.

माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा नेता रामकृष्णा हा बेपत्ता आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर झालेल्या चकमकीत माओवाद्यांनी त्याला पकडलं आणि त्याचा छळ
केला, असा माओवाद्यांचा आरोप आहे. रामकृष्णावर 2 कोटी रुपयांचं बक्षीस आहे.

आंध्र प्रदेश सरकारशी 2004 माओवाद्यांची चर्चा झाली होती. त्यावेळी रामकृष्णा यानेच माओवाद्यांचं नेतृत्व केलं होतं. रामकृष्णा बेपत्ता झाल्यानंतर रामकृष्णाची पत्नी शिरिषा हिने हायकोर्टात याचिका दाखल केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close