पेट्रोलच्या टाक्या फुल करा… पेट्रोलपंप चालक अाजपासून संपावर

November 3, 2016 9:36 AM0 commentsViews:

petrol_price_hike

03 नोव्हेंबर –  पेट्रोल पंपचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तेल कंपन्या चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ देशातील सर्व पंपचालकांनी उद्यापासून दोन दिवस पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर येत्या शनिवारपासून म्हणजेच ५ नोव्हेंबर एकाच पाळीत विक्री आणि 6 नोव्हेंबरपासून साप्ताहिक सुट्टीही जाहीर केली आहे.

इंडियन पेट्रोल डिलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 3 आणि 4 तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे तेवढाचा साठा विक्रीकरून पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच 5 नोव्हेंबरपासून एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 9 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्याच निर्णय फामपेढाने घेतला आहे.

19 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरूवात झाली होती. मात्र,  तेल कंपन्या पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं फामपेढाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलंय. तसेच तेल कंपन्यांनी डिलर्स कमिशन नीट ठरवले नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

या आंदोलनामुळे येत्या दोन दिवसांत पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटाक ग्राहकांना बसणार आहे. कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

दरम्यान, याआधी फामपेडानं आपल्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे या आंदोलनानं देशभरातील ग्राहकांना फटका बसणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close