मी पुन्हा खेळेन की नाही माहीत नाही – सायना नेहवाल

November 3, 2016 10:43 AM0 commentsViews:

saina-nehwal_express-file-m

3 नोव्हेंबर: जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालबद्दल एक अस्वस्थ करणारी बातमी आहे.माझ्या करिअरचा हा शेवट असू शकतो, असं धक्कादायक विधान सायनानं केलंय.
तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालीय.शस्त्रक्रियेनंतर आता ती बरी होण्याच्या वाटेवरही आहे. पण या दुखापतीमधून ती पूर्णपणे बाहेर येऊ शकेल की नाही, हे तिलाच पक्क माहीत नाहीय.
याच दुखापतीमुळे तिला रिओ ऑलिम्पिकमधूनही मध्येच बाहेर पडावं लागलं होतं. मी फिटनेस वाढवण्याचा प्रयत्न करतेय. काही लोक म्हणतायेत की मी पुन्हा खेळेन की नाही, माहीत नाही.मलाही असंच वाटतं, असं तिनं एका मुलाखतीत म्हटलं.
सायना म्हणते, माझा फिटनेस वाढवण्याचा मी प्रयत्न करतेय. हार किंवा विजयाबद्दल मी आता विचारच करत नाहीय. अनेक लोकांना वाटू शकतं की माझं करिअर संपेल आणि मी पुन्हा खेळणार नाही. खरं सांगायचं तर हा विचार माझ्याही मनात येतो. बघूयात काय होतंय ते. मी संपले असा विचार लोकांनी केला तर मला आनंदच होईल. सध्या माझ्याबद्दल लोक विचार करतात. कदाचित भविष्यात ते करणार नाहीत. सध्या मी माझ्या तब्येतीची काळजी घेतेय. मला धडधाकट रहायचंय कारण दुखापतीत यातना खूप असतात. मी दूरगामी प्लॅन्स बनवत नाहीय. सध्या मी फक्त पुढच्या एका वर्षाचा विचार करतेय. 5-6 वर्षांसाठीचं टार्गेट मी सेट करणार नाहीय.
सायनाच्या या विधानानं तिचे फॅन्स चिंतेत पडलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close