चहावाल्याला विसरा..,’ही’ भारतीय चहावाली ठरली ‘बिझनेस वुमन ऑफ द इयर’

November 3, 2016 2:25 PM0 commentsViews:

uppma-virdi-is-the-business-woman-of-the-year-in-australia980-1478160292_980x457

03 नोव्हेंबर:  आपल्याकडे अभ्यासात फार प्रगती नसलेल्यांना ‘जा चहाची टपरी टाक ‘असं हिणवलं जातं. मात्र हेच ‘चहावाले’ आता फेमस होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी चहावाला अर्शद खान हा चहावाला आपल्या निळ्या डोळ्यांमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय राहिला. एका फोटोग्राफरने फोटो पोस्ट केल्यानंतर अर्शद रातोरात फेमस झाला. कहर म्हणजे त्याला मॉडेलिंगच्या ऑफर आल्या आणि तो एकाएकी लाखो रुपयांचा मालक झाला. ह्याला नशिबच म्हणावं…मात्र एक चहावालीसुद्धा आहे जिला तिच्या कर्तृत्वासाठी सातासमुद्रापार गौरविण्यात आलं. उप्पमा विरदी असं तिचं नाव असून इं़डियन ऑस्ट्रेलियन बिझनेस कम्युनिटी अवॉर्डस्‌ने तिला बिझनेस वुमन ऑफ द इयर 2016 या पुरस्काराने गौरविण्यात आलं. गेल्या आठवड्यात सिडनीतील एका शानदार कार्यक्रमात 26 वर्षीय उप्पमाला गौरविल्यानंतर सगळ्यांकडुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

7710_Chai_Wali

एका फर्ममध्ये नामांकित वकील म्हणून काम करत असताना चहा,त्याची चव आणि त्याच्या प्रकारांविषयीची आवड तिला पुन्हा पुन्हा खुणावत होती. आजोबांकडुन आयुर्वेदाविषयी ज्ञान मिऴाल्यानंतर तिला ह्यात रस वाटु लागला आणि तिच्या या आवडीचेच रुपांतर जॉईंट बिझनेसमध्ये झाले. तिच्या आवडीनेच जागतिक पातळीवर तिला इतका मोठा सन्मान मिळवून दिला आहे.

uppma1_1

सुरुवातीला तिने ह्या स्पेशल चहापती मित्र-मंडळींमध्ये आणि कुटुंबियांना वापरण्यासाठी देऊन त्यांचा अभिप्राय घेतला. त्यांच्याकडुन आवडल्याची पावती मिळाल्यानंतर तिने ते स्थानिक दुकानात ठेवलं. तिकडे त्याचा खप वाढू लागला आणि मागणीही वाढु लागली.तिच्या व्यापाराला अधिक चालना म्हणून तिने ते ऑनलाईन विकायला सुरू केले आणि त्याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तिची आवड,़कार्यतत्परता आणि चहासंबंधीत विविध संशोधनामुळे तिला इतका मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि ती नक्कीच कौतुकास पात्र आहे.

uppma2

खंत एवढ्याच गोष्टीची आहे की, निळ्या डोळ्यांचा चहावाला तरुणांनी ज्या वेगाने व्हायरल झाला तो वेग उप्पमाचे कौतुक करताना दिसून येत नाहीये. एका तरुण भारतीय मुलीने मिळविलेल्या या यशाचे कौतुकही त्याच उत्सुकतेने करायला हवे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरु शकतो,प्रेरणादायी ठरु शकतो आणि नवीन क्षेत्राची दालनं उघडु शकतो. या अचिव्हमेंटसाठी तिचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close