एक्स्प्रेस वेवर भरधाव कारने दोन पोलिसांनी उडवलं

November 3, 2016 3:03 PM0 commentsViews:

expressway_Accident

03 नोव्हेंबर : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एका भरधाव कारने 2 पोलिसांना उडवल्याची घटना घडलीये. या अपघातात दोन्ही वाहतूक पोलिसांची प्रकृती गंभीर आहे. महिलेचा कारवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडलाय.

वाहतूक पोलीस कर्मचारी शिवानंद मोसलगी आणी कैलास कदम हे दोघं लेन कटिंग आणि अती वेगानं जाणा-या गाड्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. त्याचवेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणा-या कारने दोघांना उडवलं. रेखा शहा असं या महिलेचं नाव आहे. तिचा कारवरचा ताबा सुटला, आणि दोघांना उडवलं. यानंतर गाडी दुस•या एका गाडीवर जाऊन आदळली. या महिलेना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर जखमी पोलिसांवर सोमाटणेमधल्या पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close