काळच पवारसाहेबांचा वारसदार ठरवेल -सुप्रिया सुळे

November 3, 2016 3:49 PM0 commentsViews:

sule_pawar03 नोव्हेंबर : शरद पवारांचा राजकीय वारसदार नक्की कोण असेल ते आताच सांगता येत नसलं तरीही काळच त्याचं उत्तर देईल असं सुचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.

सुप्रिया यांनी पुण्यात आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यातल्या राजकीय वारसाचा उल्लेख करताना पवार साहेबांचा पुढचा वारसदार कोण असेल याबाबत बोलण्याच्या ओघात त्यांनी हे सूचक विधान केलं. विशेष म्हणजे या आधीही अजित पवार की सुप्रिया सुळे शरद पवारांच्या वारसदार ठरणार अशी चर्चा रंगली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close