शक्तिवर्धक आणि सौंदर्यवर्धक मूग

November 3, 2016 4:17 PM0 commentsViews:

2 नोव्हेंबर: मूग हे कडधान्य मूळचं भारतातलं. इतर कडधान्याप्रमाणे मूग वातुळ नाही. भारतातून मूग चीन,इंडोनेशिया,जावा इथे गेला. आज आफ्रिका,अमेरिका आणि वेस्ट इंडीज इथेही मूग पिकतो.

 

1. मूग पौष्टिक आहे.मोड आलेले मूग जास्त पौष्टिक समजले जातात.

2. मूग पचायला हलके. त्यात पोषणमूल्य जास्त. त्यामुळे आजारी माणसाला मुगाची खिचडी, मुगाचं पाणी दिलं जातं.

3. मुगाचे पिठ पाण्यात कालवून त्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्याची आग कमी होते.

4. कॉलरा, गोवर, कांजण्या, टायफाइड यावर मुगाचं पाणी देतात.

5. मुगाचं पिठ सौंदर्यसाधन म्हणून वापरलं जातं. या पिठाचा चेहऱ्यावर लेप दिला तर चेहरा उजळतो.

6. उडीद आणि मूग पीठ एकत्र करून केस धुतल्यास डोक्यातला कोंडा कमी होतो.

7. मोड आलेले मूग सॅलेडमध्ये वापरले जातात. मुगाचं वरण तर घराघरात केलं जातं. मूग शक्तिवर्धक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close