खामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी 7 जणांना अटक

November 3, 2016 7:04 PM0 commentsViews:

buldhana34बुलडाणा, 03 नोव्हेंबर : राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावातील आदिवासी आश्रमशाळेतल्या 5 मुलींवर बलात्कार झालाय. खामगावच्या निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आलीये. मात्र, 3 आरोपी अजूनही फरार आहे.

खामगावच्या याच नीनाजी कोकरे आश्रमशाळेत आदिवासी मुलींवर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या मुली दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर या प्रकरणाला ख•याअर्थाने वाचा फुटलीय. पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळेतील 8 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर येतंय.

या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल होताच पोलिसांनी 10 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. चौकशीनंतर 7 जणांना अटक करण्यात आलीये. माजी आमदार नानाजी कोकरे यांची ही आश्रमशाळा असून तिथं अनेक आदिवासी मुली शिक्षण घेतात तरीही तिथं महिला अधिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशातच हा बलात्काराचा गुन्हा उघडकीस आल्याने आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेचा आलाय.

काय आहे घटनाक्रम?
 – निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळा, पाळा (खामगाव)
- शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा
- आश्रमशाळेत एकुण 105 मुली शिकत आहे
- जळगाव, अकोला, बुलडाण्यातील मुली या आश्रमशाळेत आहेत
- दिवाळीत सुट्टीवर गेलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथल्य़ा मुलींनी बलात्कार झाल्याची बाब पालकांना सांगितली

- बुधवारी रात्री एकनाथ खडसे यांच्याकडे या पिडीत मुलीच्या पालकांनी भेटून तक्रार केली
 – खडसे यांनी रात्री उशिरा पाडूरंग फुंडकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली
- त्यानंतर सूत्र वेगाने हालली, फूंडकरांनी पोलिसांना ताबडतोब कारवाई करण्याच्या सुचना दिल्या
- एका पीडित मुलीच्या तक्रारीवरुन दुपारी खामगाव पोलिसांनी गुन्हे दाखल
- खामगाव पोलिसांनी आतापर्यत 16 जणांना ताब्यात घेतलंय
- सर्वच्या सर्व आश्रमशाळेचे कर्मचारी,अधिकारी
 – या सर्वांची चौकशी सुरू
- चौकशीनंतर 7 जणांना अटक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close