क्रूड तेलाचे दर वधारले

October 17, 2008 4:41 PM0 commentsViews: 4

17 ऑक्टोबर, मुंबईआठवड्याच्या सुरुवातीला 84 डॉलरपर्यंत गेलेल्या क्रूड तेलाचे दर दोन-तीन दिवसांपूर्वी 68 डॉलरपर्यंत खाली गेले होते. पण आज क्रूड तेलाच्या दरांमध्ये पुन्हा थोडी तेजी आली. हे दर प्रति बॅरल 70 डॉलरच्या वर गेलेत. क्रूड तेलाचे दर गेल्या वीस महिन्यांमधल्या सर्वात खालच्या स्तरावर आले आहेत. येत्या 24 तारखेला ओपेकची बैठक होत असून त्यात क्रूड तेलाचं उत्पादन दर दिवशी एक मिलियन बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, सोन्याचे दर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 डॉलरपेक्षा जास्त घसरले असून सराफा मार्केटमध्येही सोनं 13 हजारांच्या खाली पोहचलं आहे.

close