‘ए दिल मुश्किल’ विरोधात ‘संभाजी ब्रिगेड’कडून थिएटरची तोडफोड

November 3, 2016 5:30 PM0 commentsViews:

kalyanकल्याण, 03 नोव्हेंबर : संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा ‘ए दिल है मुश्किल’ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आज कल्याणमधील सर्वोदय मॉलच्या थिएटरची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

मनसेने तलवार म्यान केल्यानंतर ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या विरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरली. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिकाच संभाजी ब्रिगेडने मांडली. आज कल्याणमधील सर्वोदय मॉलमधील थिएटरवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांनी थिएटरच्या तिकीट खिडकीची तोडफोड केली आणि चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसंच पोस्टरला काळेही फासले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close