लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आठवलेंचाही मेणाचा पुतळा

November 3, 2016 7:31 PM0 commentsViews:

athavale3303 नोव्हेंबर : लोणावळ्यातील प्रसिद्ध सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मेणाचा पुतळाही उभारला जाणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींचे पुतळे लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये पहायला मिळतात. अशा 75 व्यक्तींचा समावेश असलेल्या या म्युझियममध्ये आता रामदास आठवलेंचा पुतळाही ठेवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अण्णा हजारे यांच्या पंक्तीत आता रामदास आठवलेही आपल्याला दिसतील. येत्या महिन्याभरात आठवलेंचा पुतळा उभारला जाईल अशी माहिती संग्रालयाचे प्रमुख सुनिल यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close