पेंग्विन परत पाठवा, लोकायुक्तांचे पालिकेला आदेश

November 3, 2016 9:41 PM0 commentsViews:

pengine_new03 नोव्हेंबर : मुंबईतील राणीच्या बागेत आणलेल्या पेंग्विन प्रकरणी लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेला चांगलाच दणका दिलाय. पेंग्विन परत मायदेशी पाठवण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्त एम एन ताहिलयानी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी कारवाईचे आदेश दिलेत.

दक्षिण कोरियाच्या मत्स्यालयातून 3 महिन्यांपूर्वीच 8 पेंग्विन आणण्यात आले होते. सेऊलमधल्या कोअेक्स मत्स्यालयातून 26 जुलैला या पेंग्विन पक्ष्यांना मुंबईच्या जिजामाता उद्यानात आणलं होतं.दक्षिण कोरियातल्या सेऊलमधून आणलेल्या हम्बोल्ट जातीच्या पेंग्विनपैकी एक पेंंग्विनचा मृत्यू झालाय. या प्रकरणी सत्ताधारी शिवसेना टीकेची लक्ष झालीये. भरात भर म्हणजे पालिकेनं मृत पेंग्विनच्या जागी आणखी एका पेंग्विनची मागणी केली आहे. काही प्राणी संघटनांनी पेंग्विनला कडाडून विरोध केलाय. त्यातच  मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पेंग्विनची देखभाल योग्य पद्धतीने होते की नाही याबाबत या नोटीसमध्ये विचारणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता लोकायुक्तांनीही राणीच्या बागेच्या संचालकांना समन्सही बजावले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close