भररस्त्यावरच पत्नीला तलाक !

November 3, 2016 10:07 PM0 commentsViews:

talak34203 नोव्हेंबर : लग्नाच्या गाठी स्वर्गात जोडल्या जातात असं म्हणतात…पण जोधपूरमध्ये एकानं भररस्त्यातच पत्नीला तलाक दिल्याची घटना घडली आहे. इरफान खान असं या पतीचं नावं असून त्यानं ‘मुस्लिम पर्सनल लॉ’प्रमाणं तीन वेळा तलाक शब्द उच्चारत पत्नी फरहा खानला तलाक दिलाय.

पत्नी फराहनं या तलाकला विरोध केला असून त्याविरोधात तीनं न्यायालयात अर्जही केलाय. पत्नी फराह मला मारहाण करायची, माझ्या आई,बहिणीशी फराह वारंवार भाडणं करायचा असा आरोप पती इरफान यानं केलाय. तर मुलीला जन्म दिल्यानंच सासरच्यांनी माझा छळ केल्याचा आरोप फराहनं केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close