65 वर्षे अन्न-पाण्याविना…

April 29, 2010 12:24 PM0 commentsViews: 1

29 एप्रिल

अहमदाबादमधल्या एका 82 वर्षाच्या वृद्धाने आपण गेल्या 65 वर्षांत एकदाही अन्न पाणी घेतले नसल्याचा दावा केला आहे.

प्रल्हाद जानी असे या वृद्धाचे नाव आहे.

अहमदाबादमध्ये ते माताजी या नावानेही ओळखले जातात. माताजींच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे असलेल्या आत्मिक शक्तीच्या जोरावरच ते जगतात.

त्यांचा हा दावा फोल ठरवण्यासाठी आता 35 डॉक्टरांची टीम माताजींच्या तब्येतीवर प्रयोग करत आहे.

मात्र त्यांच्या दीर्घायुष्याचे गुपित अजूनही डॉक्टरांना उलगडलेले नाही.

close