कुठे जातात हिरो-हिरॉइन्सचे ड्रेसेस?

November 4, 2016 11:30 AM0 commentsViews:

4 नोव्हेंबर: सिनेमांमध्ये आपण आकर्षक कपडे पाहतो. हिरो-हिरॉइन्सची वेगवेगळी स्टाइल स्टेटमेंट्स पाहतो. पण हे ड्रेसेस नंतर जातात कुठे? काय करतात या ड्रेसेसचं?

1.अनेकदा या ड्रेसेसचा लिलाव केला जातो. त्यातून मिळणारे पैसे समाजकार्यासाठी वापरले जातात.’देवदास’ सिनेमातल्या माधुरी दीक्षितचा हिरवा ड्रेस 3 कोटींना विकला गेला.

2. कलाकारांचे फॅन्स तर आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी कितीही खर्च करायला तयार असतात. सलमान खानच्या ‘मुझसे शादी करोगी’ सिनेमातला टॉवेल एका फॅननं दीड लाखाला खरेदी केला होता.

3. अनेकदा कलाकार ड्रेसेस आपल्या घरी घेऊन जातात. सिनेमाचे निर्मातेही काही आक्षेप घेत नाहीत. कलाकार हे ड्रेसेस आठवण म्हणून घेऊन जातात.

4.त्या त्या सिनेमाचे ड्रेस डिझायनर सर्व पोशाख आपापल्या घरी घेऊन जातात. मनीष मल्होत्रा, अंजू मोदी हे डिझायनर्स ड्रेसेस परत घेतात.

5. काही निर्माते सिनेमातले सर्व किमती पोशाख एका मोठ्या पेटीत ठेवून देतात. त्यावर सिनेमाचं नाव टाकून प्रॉडक्शन हाऊसमध्ये ते ठेवले जातात.

6. या पोशाखांना मिक्स अँड मॅच करून ज्युनियर कलाकारांना दिले जातात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close