औरंगाबादेमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चा

November 4, 2016 12:29 PM0 commentsViews:

Bahujan Kranti morcha'

04 नोव्हेंबर :  राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असताना आज औरंगाबाद येथे बहुजन समाजाच्या वतीने ऍट्रॉसिटीच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर आज औरंगाबाद येथे बहुजन समाजाच्या वतीने बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, ऍट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, यासारख्या विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.

या बहुजन क्रांती मोर्चाला क्रांती चौकापासून सुरुवात करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close