उद्यापासून नव्या 26 लोकल्स

April 29, 2010 12:56 PM0 commentsViews: 11

29 एप्रिल

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना उद्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. उद्यापासून 26 नव्या लोकल या मार्गावर धावणार आहेत.

तळेगाव-बेलापूरदरम्यान डीसी ओव्हरहेडचे एसीमध्ये रुपांतर केल्यामुळे या नव्या गाड्या सेवेत येत आहेत. शिवाय 3 मेपासून सर्व जलद गाड्या बारा डब्यांच्या होणार आहेत.

या नव्या गाड्यांमुळे लोकलच्या फेर्‍या 1468 वरून 1494 होणार आहेत.

मुख्य मार्गावरच्या गाड्यांची संख्या 756 वरून 782 होईल.

सकाळच्या स्लो गाड्यांची संख्या 41 वरून 43 होईल.

संध्याकाळच्या स्लो गाड्यांची संख्या 43 वरून 47 होईल.

close