नवी मुंबईच्या लोकप्रतिनिधींचं पितळ उघड, 120 कोटींचे प्रस्ताव मंजुरीविना पडून !

November 4, 2016 4:58 PM0 commentsViews:

Navi Mumbai04 नोव्हेंबर : नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठरावावेळी मुंढे विकास कामं करत नाहीत असा आरोप करणा-या लोकप्रतिनिधींचंच आता पितळ उघडं पडलंय. तब्बल 120 कोटी रूपयांच्या शहरातील विकास कामांच्या प्रस्तावांना सर्व साधारण सभेनं मंजुरी दिलेली नाहीये.

120 कोटींचे 55 प्रस्ताव मागच्या तीन महिन्यांपासून मंजुरीविनाच पडून आहेत. आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे महापौर सुधाकर सोनावणे आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी लोकहिताचे प्रस्ताव का मंजूर का केले नाहीत हाच खरा प्रश्न आहे. आयबीएन लोकमतनं हे प्रस्ताव उघडकीस आणल्यामुळं आता लोकप्रतिनिधींची दुटप्पी भूमिका समोर आलीये. त्यामुळे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींनी लोकहिताच्या कामांना जरी मंजुरी दिली नसली तरीही आता शासन दरबारातून या प्रस्तांवांची मंजूरी घेऊन कामं सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.

रखडलेल्या 120 कोटींच्या कामांतील काही महत्वाची कामे
 
1) सर्व नोड मधील बेरीअर फ्री आणि वॉकेबिलिटी प्रस्ताव – 40 कोटी

2) महापौरांच्या प्रभागातील रबाले भुयारी मार्ग – 10 कोटी 40 लाख

3) पामबीच मार्गावर्ल तलावाच सुशोेभीकरण – 18 कोटी 33 लाख

4) महापे ते दिघा जलवाहिनी टाकणे – 7 कोटी 87 लाख

5) शहरातील मालमत्ताचे रिडार द्वारे सर्व्हेक्षण करणे – 20 कोटी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close