‘करनाटकी’ सुरूच, रॅली काढली म्हणून 40 मराठी तरुणांना अटक

November 4, 2016 5:26 PM0 commentsViews:

belgum_police04 नोव्हेंबर : बेळगावात कर्नाटकी दडपशाही सुरूच असल्याचं समोर आलंय. 40 मराठी तरूणांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. 1 नोव्हेंबरनिमित्त काळा दिवस पाळला म्हणून याचा राग म्हणून ही अटक झालीये. गेल्या चार दिवसांपासून बेळगावात हे अटकसत्र सुरू होतं.

1 नोव्हेंबरच्या दिवशी शांततेत रॅली काढूनही कर्नाटकी दादागिरी सुरूच आहे. अनेक युवकांना कारण नसताना अटक करण्यात आली असून जामीन मिळू नये यासाठी सरकार शक्य ते सारे प्रयत्न करतंय. त्यामुळे या प्रकरणी बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समिती नक्की काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. (संग्रहित फोटो)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close