अभिनयाशिवाय हे स्टार्स बिझनेसमध्येही ‘हिरो’

November 4, 2016 6:00 PM0 commentsViews:

04 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री बक्कळ पैसे कमवत असतात. त्यांची अभिनयाची बाजू आपल्याला माहीत असते. पण अभिनयाव्यतिरिक्त त्यांचे इतर व्यवसायही असतात. पाहू या कोण काय काय करतंय ते…

1.शाहरूख खान: शाहरूख खानला इंडस्ट्रीमध्ये मोठा बिझनेसमॅन मानलं जातंय. त्याची स्वत:ची रेड चिली ही कंपनी आहे. रेड चिली सिनेमे बनवतं.

2. आमिर खान: आमिर खानचंही स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. आमिर खान प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात ‘लगान’पासून झाली.  मोजकेच सिनेमे बनवल्यानंतर आता डिसेंबरमध्ये रिलीज होणारा ‘दंगल’चीही हीच कंपनी निर्मिती करतेय.

3. सलमान खान: सलमानचंही प्रॉडक्शन हाऊस आहे. आपले भाऊ अरबाज आणि सोहेलसोबत तो सिनेमांची निर्मिती करतो.

4. सनी देओल: सनीचा म्युझिक साऊण्ड स्टुडिओ आहे.सनी रेकॉर्डिंग स्टुडिओ नावानं हा स्टुडिओ आहे.

5. मिथुन चक्रवर्ती: मिथुन चक्रवर्तीचं उटीला फाइव्ह स्टार हॉटेल आहे.

6. ट्विंकल खन्ना: ट्विंकल आपली आई डिंपलसोबत मेणबत्तीचा बिझनेस करते. तिच्या मेणबत्या परदेशातही लोकप्रिय आहेत.

7. सुनील शेट्टी: सुनील शेट्टीचा कपड्यांचा बिझनेस आहे. त्याची उलाढाल करोडोंची आहे.

8. चंकी पांडे: चंकी पांडेचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत.

9. रोहित रॉय: रोहितची स्वत:ची सिक्युरिटी एजन्सी आहे. बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवता आलेली नसली तरी रोहित अनेक बॉलिवूड स्टार्सना सुरक्षा व्यवस्था पुरवतो.

10. बिंदू दारा सिंग: बिंदूचा स्वत:चा प्रॉपर्टी बिझनेस आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close