कोकरे आश्रमशाळेची मान्यता रद्द करणार -विष्णू सावरा

November 4, 2016 9:09 PM0 commentsViews:

vishanu_savara04 नोव्हेंबर : खामगावच्या कोकरे आश्रमशाळेची मान्यता रद्द करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिलीये. तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार अशी माहितीही त्यांनी दिली.

बुलडाण्याच्या खामगाव येथील कोकरे आश्रमशाळेत 5 मुलींवर बलात्काराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आलीये. आज आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी पाळा इथल्या नीनाजी कोकरे आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं विष्णू सावरा यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणात आणखी सहा मुलींची वैद्यकीय तपासणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close