मुख्य पाईपलाईनला जोडली खाजगी पाईपलाईन

April 29, 2010 2:27 PM0 commentsViews:

29 एप्रिल

मुंबईतील आर्थर रोड नाक्याजवळ मुख्य पाण्याच्या पाईपलाईनलाच वेगळी खाजगी पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत आहे.

तब्बल 12 इंच व्यासाच्या या पाईपजोडणीचे काम रात्री उशिरा सुरू होते. काही स्थानिक रहिवाशांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबवण्यात आले.

हे अवैध काम सुरू असताना पाण्याची मुख्य पाईपलाईनही फुटली होती.

टॉवरला पाणीपुरवठा करण्यासाठी बिल्डरला अशा प्रकारे पाईप जोडण्याची परवानगी दिली कुणी, असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

close