गुजरातमध्ये बिबट्याला जिवंत जाळलं

November 4, 2016 11:01 PM0 commentsViews:

 lepard attack

04 नोव्हेंबर : गुजरातमधल्या सुरत जिल्ह्यात एका बिबट्याला जिवंत जाळण्याची घटना घडलीय. या बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू ओढवला. या घटनेनंतर वन विभागाने या बिबट्याला पिंजरा लावून पकडलं. पण लहान मुलीच्या मृत्यूमुळे संतापलेल्या जमावाने बिबट्याच्या पिंज-याला आग लावली आणि बिबट्याला जिवंत जाळलं. गुजरात वनविभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

या बिबट्याला पिंज-यात पकडल्यानंतर या पिंज-याजवळ वनरक्षक तैनात करण्यात आले होते. संतापलेल्या गावक-यांनी या वनरक्षकांना बाजूला हटवलं आणि या पिंज-याला आग लावली. सुरतमधल्या उमरपाडा तालुक्यात वाडी गावामध्ये निकिता वासवा या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आणि तिला जंगलात ओढून नेलं.

यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. तसंच 4 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. वन विभागाच्या पिंज-यात बिबट्या सापडला. पण गावक-यांनी त्याला जाळून टाकलं.हल्लेखोर बिबट्यांना पकडल्यानंतर ते वनविभागाच्या ताब्यात ठेवले जातात. काही राज्यांमध्ये अशा बिबट्यांसाठी वनविभागाने निवारा केंदं्रही उभारलीयत. पण वनविभागाच्या ताब्यात असलेल्या बिबट्याला जाळण्याची ही देशातली ही पहिलीच घटना आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close