ईस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात, 6 ठार

November 5, 2016 12:36 PM0 commentsViews:

TAXI ACCIDENT

04 नोव्हेंबर : मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर अन्य ३ जखमी झाले. टॅक्सीचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ​

फ्रीवेवरून मुंब्राकडे जाणाऱ्या टॅक्सीचा वाडीबंदरजवळ एका वळणावर अपघात झाला. टॅक्सीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. त्यामुळे टॅक्सीचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. टॅक्सीतील 9 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टॅक्सीतील प्रवासी मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी जात होते. हा अपघात इतकी भीषण होती की टॅक्सी ​ डिव्हायडरला धडकली, त्यानंतर दोन वेळा पलटली.

तर या अपघातानंतर फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, पोलिस अपघाताचा तपास सुरु केला आहे. तसेच फ्रीवेवरील वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close