तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाला जोरदार प्रतिसाद

November 5, 2016 4:46 PM0 commentsViews:

tukaram_mundhe

05 नोव्हेंबर : नवी मुंबईत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी सुरु केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नेरुळमध्ये आज झालेल्या रॅलीत सर्वसामान्य नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली.

आयुक्तांनी नेरुळकरांच्या समस्यांचं निवेदन स्वीकारुन त्वरीत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. नियमात राहूनच यापुढेही लोकांसाठी काम करणार असल्याचा निर्धार यावेळी तुकाराम मुंढेंनी बोलून दाखवला.

दरम्यान, IBN लोकमतशी बोलताना, नवी मुंबईत विकासकामांचे 55 प्रस्ताव प्रलंबित असल्याच्या बातमीला मुंढेंनी दुजोरा दिला. नगरसेवकांनी प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे हे प्रस्ताव तसेच पडून आहेत. 90 दिवसांचा कालावधी उलटल्यावर राज्य सरकारकडून प्रस्ताव मंजूर करून घेऊन कामं सुरू करणार, असं स्पष्टीकरण मुंढेंनी दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close