येत्या आधिवेशनात सरकारविरोधात हक्कभंग आणणार – विखे पाटील

November 5, 2016 5:25 PM0 commentsViews:

vikhe patil

05 नोव्हेंबर : राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्यासंबंधीच्या घोषणेची अद्यापही अंमलबजावणीच झाली नसल्याचा आरोप करत येत्या आधिवेशनाक राज्य सरकारविरोधात काँग्रेस हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्याचबरोबर, राज्य सरकारने खोटी आश्वासनं देऊन जनतेची आणि सभागृहाची फसवणूक केल्याचा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारने आतापर्यंत केवळ घोषणा केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना एक लाखाऐवजी 5 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा एकनाथ खडसेंनी गेल्या वर्षीच्या अधिवेशनात केली होती. प्रत्यक्षात मात्र काहीच मदत केलेली नाही. त्यामुळे अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची फसवणूक झाल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. त्यामुळे आम्ही सरकारविरोधात हक्कभंगाचा आणणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

 फडणवीस सरकारला सत्तेत येऊन नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली असून राज्याने दोन वर्षांत फक्त या क्षेत्रातच आघाडी घेतल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला होता. विकासामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा युती सरकारचा दावा साफ खोटा आहे. हे सरकार नव्हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका त्यांनी केली. सरकारला जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. त्यांनी जनतेचा विश्वास गमावला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close