स्फोटातून थोडक्यात बचावला बॉम्बशोधक पथकातला श्वान

November 5, 2016 7:54 PM0 commentsViews:

kutra 1231

05 नोव्हेंबर : आईडीच्या स्फोटातून एका कुत्र्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. ओडिशामधल्या रायगादा तालुक्यात ही घटना घडली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेत असणारा श्वान पोलिसांना बॉम्ब शोधण्यात मदत करत असताना एका ठिकाणी स्फोट झाला. मात्र सुदैवाने या स्फोटातून कुत्रा थोडक्यात बचावला.

आईडीच्या स्फोटातून थोडक्यात बचावलेल्या या श्वानाला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या या श्वानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नक्षलवाद्यांनीच हा आईडीचा स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर बॉम्बशोधक पथकाने तातडीन या ठिकाणी असणारा बॉम्ब शोधून काढत तो निकामा केला. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close