महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रंगले राजकारण

April 29, 2010 2:52 PM0 commentsViews: 4

अमेय तिरोडकर, मुंबई

29 एप्रिल

एकीकडे महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र दिनावरून राजकीय पक्षांमध्ये राजकारण सुरू झाले आहे.

आता हुतात्म्यांच्या वारसांचे सत्कार करण्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे.

मुंबई राष्ट्रवादीने परप्रांतीय हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार ठेवला आहे. पण भाजपने त्याला विरोध केला आहे.

याबाबत मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा म्हणतात, ज्या परप्रांतीयांनीही संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान केले त्यांचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

तर हे प्रांतीयवादाचे राजकारण आहे. हुतात्म्यांमध्ये भेदभाव करता कामा नये, असे मंुबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांचे म्हणणे आहे.

त्यावर कर्नाटकात भाजप सीमावासीयांवर अत्याचार करत असल्याचा टोला वर्मा यांनी लगावला आहे.

हे तू तू मैं मैं राजकीय पोळीसाठी आहे. राष्ट्रवादी काय किंवा भाजपा काय, त्यांचे राजकीय अजेंडा सेट आहेत. ते राबवण्यासाठी त्यांनी आता महाराष्ट्र दिनाचे निमित्त शोधले आहे.

राष्ट्रवादी आणि भाजप हे तसेही मुंबईत तिसर्‍या, चौथ्या नंबरवरचे पक्ष आहेत. पण त्यांच्या या वादात त्यांचे मित्रपक्षही उतरतात का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close