…म्हणून मुंबापुरीत मराठा समाजाकडून बाईक रॅली

November 6, 2016 8:53 AM0 commentsViews:

maratha_morcha306 नोव्हेंबर : मराठा मोर्चा मुंबईत होईपर्यंत मराठ्यांच्या क्रांती मोर्चाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी विविध प्रयत्न केले जातायत. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईत होणारी बाईक रॅली..

मुंबईतील मराठा क्रांती काही कारणास्तव लांबणीवर पडला असला तरी मोर्चा आयोजकांनी आता बाईक रॅली काढण्याचं निश्चित केलंय. त्यासाठी मुंबई पोलिसांकडे रितसर परवानगीही घेण्यात आलीय. 6 नोव्हेंबरला मुंबई शहरातून ही बाईक रॅली निघेल. सोमय्या मैदान ते सीएसटी असा या बाईक रॅलीचा मार्ग असणार आहे.

मूकमोर्चांप्रमाणेच ही बाईक रॅली देखील मूक असणार आहे. पण मराठा मोर्चांची धग कायम राहावी, यासाठी बाईक रॅलीनंतर ,चित्र आक्रोश नावाचं चित्र प्रदर्शन जिल्हास्तरांवर भरवलं जाणार आहे. तसंच ज्या ज्या जिल्ह्यात मोर्चे झालेत तिथं तिथं रोजच्या रोज 100 जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचाही कार्यक्रम आखला गेलाय. एकूणच काय तर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबरला होऊ घातलेल्या मोर्चापर्यंत मराठा जागृत राहावा यासाठीचं नियोजन आत्तापासूनच आखलं जातंय.

14 डिसेंबरला नागपुरात होणारा मोर्चा आणि 25 ऑक्टोबरला नागपुरात झालेला मराठा मोर्चा यात जवळपास 2 महिन्यांचा कालावधी आहे. या काळात सरकारवरचा दबाव कायम राहावा. तसंच नागपुरातही लाखोंच्या संख्येंनं लोक जमावेत यासाठी मराठा मोर्चा आयोजकांनी आत्तापासूनच नियोजन सुरू केलंय. मुंबईत होणा•या प्रत्येक हालचालीची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. आणि म्हणूनच मुंबईतल्या मराठा मूक मोर्चाबाबत निर्णय होऊ शकला नसला तरी बाईक रॅली आयोजित करुन मुंबईत मुक मोर्चाची मागणी करणा-या मुंबईकर मराठ्यांना शांत केलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close