‘खामगाव आश्रमशाळेत 15 मुलींवर अत्याचार’

November 6, 2016 9:07 AM0 commentsViews:

khamgaon4बुलडाणा, 04 नोव्हेंबर : खामगावच्या कोकरे आश्रम शाळेत बलात्कार प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती पुढ येत आहे. आश्रमशाळेतील अजून 15 मुलींसोबत हाच प्रकार झाल्याची माहिती महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी दिली आहे.

खामगावातील कोकरे आश्रमशाळेत झालेल्या बलात्कार प्रकरणी आणखी 4 जणांना काल रात्री पोलिसांनी अटक केलीय. बुलडाणा पोलिसांनी ही कारवाई केलीय. या चारही आरोपींना 10 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सबळ पुराव्या अभावी ही न्यायालयीन कोठडी दिली आहे.अटक केलेले हे चारही आरोपी आश्रमशाळेचे कर्मचारी आहेत.

या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 15 झालीये. काल महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोकरे आश्रमशाळेला भेट दिली. यादरम्यान त्यांनी या आश्रमशाळेत असलेल्या मुंलीच्या असुरक्षितेचा आणि गैरसोयींचा पाढा वाचला. या संबधी त्यांनी पीडित मुलीची भेट घेतली होती. या मुलीवर मुलींच्या देखत अत्याचार झाल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. या पीडित मुलीशी बोलल्यानंतर ही माहिती मिळाल्याचं मिरगे यांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close