नात्याला काळीमा, बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

November 6, 2016 9:19 AM0 commentsViews:

rape dsngfsdgठाणे, 04 नोव्हेंबर : बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ठाण्यात घडलीये. माजी सैनिक असलेल्या नराधम पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. या प्रकरणी नराधम बापासह पीडितेच्या सावत्र आईला अटक करण्यात आलीये.

आरोपी  धनराज यादव माजी सैनिक असून सध्या बँकेत नोकरीला आहे. गेल्या महिन्याभरापासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे याचा पर्दाफाश झाला. आरोपी ठाण्याच्या खोपट भागातल्या हंसनगर इथल्या सेन्ट्रल वसाहतीमध्ये पीडित मुलगी आणि दुस•या बायकोसोबत राहायचा.

दीड महिन्यापूर्वी त्याने पीडित मुलीला ठाण्यातील घरी आणलं. नवरात्रीची संधी साधून धनराज याने पोटच्या मुलीशी अंगलट सुरू केली. त्यानंतर,मद्याच्या नशेत मुलीलाही जबरदस्तीने दारू पाजून मोबाईल आणि लॅपटॉपमधील अश्लील चित्रफीत दाखवयाचा.आणि भावंडासह तिला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करीत होता. सावत्र आई संध्यादेवी ही घरात टीव्हीचा आवाज मोठा करून अत्याचाराला साह्य करीत होती. लग्नानंतर तुला हे करावेच लागेल असेही ती धमकावत असे.

त्यामुळे या प्रकाराची माहिती कुणाला नव्हती. अखेर,शनिवारी कचरा फेकण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या पीडित मुलीने शेजा-यांना माहिती दिली. नौपाडा पोलिसांनी आरोपी पित्यासह सावत्र आईला अटक केली असता दोघांनीही या कुकर्माची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक पोफळे यांनी दिली. दरम्यान, या दोन्ही आरोपीवर अत्याचार आणि पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close